जत पंचायत समितीचे कामकाज समाधानकारक.

Admin


जत पंचायत समितीचे कामकाज समाधानकारक.
    - तृप्ती धोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सांगली


जत24 न्युज :- मच्छिंद्र बाबर जत

(जत तालुक्यात लोकसभा निवडणुकीअंतर्गत मतदार जनजागृती अभियान)

 
लोकसभा निवडणुकीअंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ तृप्ती धोडमिसे  तसेच ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी  शशिकांत शिंदे  यांनी आज पंचायत समिती जत येथे भेट दिली त्यांनी सकाळी पंचायत समितीच्या सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेतला त्यामध्ये पाणी टंचाई,घरकुल योजना, ग्रामपंचायत करवसुली,पंधरावा वित्त आयोग,जन सुविधा,नागरी सुविधा,अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या वस्तीचा विकास करणे इत्यादी विविध योजनेचा सविस्तर आढावा घेतला जत सारख्या दुष्काळी भागात केलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये सर्वानी 100 टक्के मतदानाचा हक्क बजावावा.तसेच मतदार जनजागृती अभियान सन 2024 अंतर्गत मतदारांची टक्केवारी वाढविण्याकरिता जत गटाकडील मुचंडी, सिद्धनाथ,आसंगी तुर्क, कोंतेवबोबलाद  आदी  कर्नाटक सिमेलगतच्या भागांमध्ये भेट देऊन जनजागृती केली.

यावेळी मतदारना   आवाहन करताना म्हणाल्या की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सर्वांनी मतदानाचा हक्क बजाऊन सांगली जिल्ह्याची टक्केवारी वाढविण्याकरिता आपले महत्त्वाचे योगदान द्यावे कारण मतदान करणे हे आपल्या सर्वांचे आध्य कर्तव्य आहे. ७ मे २०२४ रोजी सर्वांनी कुठेही न जाता पहिल्यांदा मतदान करणेचे आहे एक चांगले नागरिक म्हणुन मतदानाचा हक्क बजावायचा आहे चला मतदान करुया देशाचे प्रगती करुया,

आपले मुल्य मताचे दान आहे लोकशाहीचे दान,आपले मत आपले भविष्य अशा प्रकारे भित्तीपत्रीकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली सीमावरती भागातील लोकांना समजेल असे मतदार जनजागृती चे फलक कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये लावण्यात आलेले होते. परिसरातील जाणकार कन्नड भाषा येणाऱ्यांना त्यांनी कन्नड मधून मार्गदर्शन करण्यास सांगितले.

कन्नड भाषिकांना कन्नडमध्ये 7 मे 2024 रोजी कोणत्याही परिस्थितीमध्ये मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी महिला बचत गट प्रतिनिधी,आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थांनी सहभाग घेतला. अनेक महिलांच्या हाती मतदान जनजागृतीचे करण्यासंबंधीचे फलक कन्नड आणि मराठी भाषेत अनेक महिलांनी सोबत आणलेले होते.त्याचबरोबर पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर व पाण्याच्या उदभवाचे ठिकाण येथेही पाहणी केली व टँकर मागणी केलेल्या गावाला तत्काळ टँकर मंजुरी करण्याच्या सुचना दिल्या.

यावेळी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता  येवले साहेब ,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी  आप्पासाहेब सरगर, गटशिक्षणाधिकारी , अन्सार शेख,तसेच पंचायत समीतीकडील सर्व विभागांचे विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ मतदार उपस्थित होते.
To Top